Sharad Pawar यांचे Bhagat Singh Koshyari यांना Coffee Table Book वरून ‘फटकारे’, पत्रात काय लिहिलंय?

7 Просмотры
Издатель
#SharadPawar #BhagatSinghKoshyari #CoffeeTableBook
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे पवारांनी कोश्यारी यांनाच हे पत्र लिहिलंय. कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सुत्र स्वीकारून ५ सप्टेंबरला एक वर्ष झालं. या वर्षपूर्तीनिमित्त कोश्यारींनी जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी नावाचं एक कॉफी टेबल बूक प्रसिद्ध केलं. राज्यपालांचं हे कॉफीटेबल बूक अभिप्रायार्थ मान्यवरांना पाठवण्यात आलेत. अभिप्रायार्थ पाठवलेल्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी कोश्यारींना एक पत्र लिहिलंय. या पत्रात पवारांनी भगत सिंह कोश्यारी यांना मार्मिक भाषेत टोले लगावलेत. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा नामोल्लेख आढळत नाही, असं म्हणत पवारांनी कोश्यारींच्या जनराज्यपाल या पुस्तकाच्या नावावर बोट ठेवलंय. पण कॉफी टेबल बूकमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी नोंदवलेलं मत यांचा उल्लेख नसल्याचंही पवारांनी आपल्या पत्रात म्हटलंय. हे कॉफी टेबल बूक चित्ररूप आहे. राज्यपालांचे वर्षभरातले महत्त्वाचे प्रसंग चित्ररूपात मांडण्यात आलेत. पण भल्या पहाटे झालेला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचा फोटो कॉफी टेबल बूकमध्ये नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website:
Facebook:
Instagram:
Twitter:
Категория
Обучающее видео
Комментариев нет.